रोम : भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पूनियाने रोम रँकिंग सीरिज स्पर्धेत ६५ किलो फ्रीस्टाइल गटात अंतिम फेरीत धडक मारली आहे. यासह त्याने स्पर्धेत रौप्यपदक निश्चित केलं आहे.
शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बजरंगने यूक्रेनच्या वासिल शुपतार याचा ६-४ ने पराभव केला. आता अंतिम फेरीत त्याच्यासमोर अमेरीकेचा कुस्तीपटू जोर्डन माइकल ओलिवर याचं आव्हान असणार आहे.
Bajrang wins 6-4 over Shuptar 😎@BajrangPunia and @that_dude_JO to wrestle for the 🥇 at the #WrestleRome 65kg finals!
Go for Gold, Bajrang 💪🏼#BetterEveryday #JSWSports
— JSW Sports (@jswsports) January 18, 2020
याआधी, बजरंगने उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जोसफ क्रिस्टोफर मैक केना याचा ४-२ ने तर पहिल्या फेरीत बजरंगने अमेरिकेच्या जैन एलेन रदरफोर्डचा ५-४ ने पराभव करत आगेकूच केली होती.
तर दुसरीकडे भारताचे कुस्तीपटू जिंतेदर (७४ किलो) आणि दीपक पूनिया (८६ किलो) यांना पराभवाचा सामना करावं लागल्यान त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. जितेंदरला उपांत्यपूर्व फेरीत तूर्कीच्या सोनेर देमिरतासकडून ४-० असा तर दीपक पूनियाला रिकोच्या इथान एड्रियन रामोकडून १-११ असा पराभव स्विकारावा लागला.