हैद्राबाद बलात्कार पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया
हैद्राबाद : हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी आज सकाळी पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. पोलिसांनी तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेले असता त्यांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केले आहे. हैदराबादमध्ये 27 नोव्हेंबर रोजी महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर तिची हत्या करत मृतदेह जाळून देण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली होती.
Father of the woman veterinarian on all 4 accused killed in police encounter: It has been 10 days to the day my daughter died. I express my gratitude towards the police & govt for this. My daughter’s soul must be at peace now. #Telangana pic.twitter.com/aJgUDQO1po
— ANI (@ANI) December 6, 2019
पीडितेच्या कुटुंबाने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. चकमकीची बातमी ऐकून धक्का बसला, मात्र आमच्या मुलीला लवकर न्याय मिळाल्याचा आनंद असल्याचे कुटूंबियांनी म्हटले आहे. पीडितेच्या बहिणीने सांगितले की, सर्व आरोपी मारले गेले आहेत याचा आनंद आहे. या घटनेमुळे एक उदाहरण सर्वांसमोर उभे राहील. मी पोलिस आणि मीडियाचे दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानते. पीडितेच्या वडिलांनीही तेलंगणा पोलिसांचे आभार मानले आहेत. तिच्या आत्म्याला आता शांती मिळाली असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.