मुंबई – हैद्राबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज सकाळी तेलंगणा पोलिसांनी एन्काऊंटर केला. तेलंगणा पोलिसांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चारही आरोपींचा खात्मा केला आहे. तेलंगणा पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे त्यांचे कौतक केले जात आहे. तर बॉलिवूड जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
Bravo Telangana Police. My congratulations!
— Rishi Kapoor (@chintskap) December 6, 2019
ऋषी कपूर यांनी ट्विट केले की,’ शाब्बास तेलंगणा पोलीस ! तेलंगणा पोलिस दलाचे मनःपूर्वक अभिनंदन!,’ असे म्हणत ऋषी कपूर यांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले आहे. दरम्यान , तेलंगणाच्या राजधानीजवळील शादनगर गावात 7 नोव्हेंबरला एक धक्कादायक प्रकार घडला होता. अज्ञात लोकांनी पशुवैद्यकिय महिला डॉक्टरवर बलात्कार करूनपीडितेला जिवंत जाळले होते. या घटनेनंतर दोषींना लवकरात लवकर फाशीच्या शिक्षेची मागणी होत होती. त्यासाठी देशभरात आंदोलनं होतं होती. मात्र आज या आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. तेलंगणा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे देशातून पोलिसांचे आणि तेलंगणा सरकारचे कौतूक केले जात आहे.