बॉलिवुड अभिनेत्री भूमि पेडणेकर सध्या आपल्या आगामी “पति, पत्नी और वो’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यापूर्वी भूमिचा “सोनचिडिया’ आणि “सांड की आंख’ हे दोन चित्रपट यंदाच्या वर्षात प्रदर्शित झाले आहेत. ज्यात तिने दमदार भूमिका साकारली होती. आता ती “पति, पत्नी और वो’मध्ये एका स्टायलिश महिलेच्या भूमिकेत झळकणार आहे.
भूमि आपले ग्लॅमरस फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करत असते. याच दरम्यान भूमिला एका चाहत्याने चक्क ट्वीट करत प्रपोज केले. चाहत्याने ट्वीटमध्ये म्हटले की, हॅलो ब्युटिफुल मॅम, मी एक दिवशही तुमचा फोटो पाहिल्याशिवाय राहू शकत नाही.
तुम्ही खूपच सुंदर आहात, तुम्ही एक नॉर्मल मुलगी असायला हवी होती, पण तुम्ही प्रसिद्ध अभिनेत्री आहात. मी कितीही प्रेम केले तरी मला काही संधी मिळणार नाही. कारण तुम्ही नॉन सिलेब्रिटीशी लग्न करण्याचा काही संबंधच नाही. या गोष्टीचे दुःख आहे.
या ट्वीटवर भूमिनेही खूपच मजेशीर असे उत्तर दिले. भूमि म्हणाली, सेलिब्रिटी असो वा नसो, लग्न होण्याची शक्यता फारच कमी आहे. पण मी तुम्हाला स्वत: ला चुकवू देणार नाही आणि मी शक्य तितक्या मोठ्या पडद्यावर येईन.
यानंतर भूमीचा हा चाहता इथेच थांबला नाही आणि त्याने त्याच्या ट्विटला उत्तर दिल्याबद्दल भूमीचे आभार मानले. तो म्हणाल, “धन्यवाद, तुम्ही नेहमी मोठ्या स्क्रीनवर यावे अशी मी प्रार्थना करतो. पण माझी समस्या वेगळी आहे. तुमची सुंदरता खूपच कातिलाना आहे.
मी तुम्हाला बघण्यापूर्वी मरू इच्छित नाही. मला माहित आहे की तुम्ही माझ्याशी लग्न करणार नाही. पण माझ्या आयुष्यात तुम्हाला एकदा भेटण्याची इच्छा आहे.
दरम्यान, “पति, पत्नी और वो’मध्ये भूमि पेडणेकरसोबत कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे झळकणार आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे.