माझे करिअर बहुतेक संपले होते- फातिमा सना शेख

आमीर खानच्या “दंगल’मध्ये दिसलेली फातिमा सना शेख आता लागोपाठ दोन सिनेमांमध्ये दिसणार आहे. “ल्युडो’ आणि “सूरज पे मंगल भारी’ हे दोन्ही सिनेमे या महिन्याच्या अखेरीस रिलीज होणार आहेत. त्यामुळे फातिमाला कमबॅक करण्यासाठी चांगली संधी मिळाली आहे. यापूर्वी “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’मध्येही फातिमा दिसली होती. मात्र हा सिनेमा बॉक्‍स ऑफिसवर सपाटून आपटला होता.

आता जरी तिला लागोपाठ दोन सिनेमे मिळाले असले तरी तिच्या करिअरमध्ये मध्यंतरी बॅड पॅच होता. फातिमाला आपल्या सिनेमामध्ये घेण्यास निर्माते उत्सुकच नसयचे. त्यामुळे तिच्या वाट्याला आलेल्या सिनेमांचे प्रमाण अगदी नगण्य असायचे. अशावेळी थोडे दिवस वाट बघण्याचा निर्णय तिने घेतला.

 

View this post on Instagram

 

👗 @kalkifashion Styled by @akshitas11 Assisted by @nishthaparwani Hair @dharamshalaorane

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh) on

आपल्याला स्वतःला निर्णय घेता यावेत, अशा ठिकाणी पोहोचण्यासाठी थोडा संयम दाखवणे गरजेचे आहे, हे तिच्या लक्षात आले. म्हणून दोन वर्षे शांत बसल्यावर तिच्या लक्षात आले की जर काहीच हालचाल केली नाही, तर काहीच उपयोग होणार नाही.

 

View this post on Instagram

 

🙂 #throwback @tejasnerurkarr @trushala_nayak @candies_collection

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh) on

त्यामुळे जो मिळेल तो सिनेमा स्वीकारायचे तिने ठरवले. त्यातूनच “ल्युडो’ आणि “सूरज पे मंगल भारी’ हे दोन सिनेमे तिच्या वाट्याला आले. जर हे सिनेमे स्वीकारलेच नसते तर आता आपले करिअर संपले, असेच तिला वाटायला लागले होते.

 

View this post on Instagram

 

🙂

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh) on

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.