“लूडो’मध्ये अभिषेकचा जबरदस्त लुक

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन याचा नेटफ्लिक्‍सवर “लूडो’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. रिलीज होण्यापूर्वी अभिनेषके इंस्टग्रामवर “लूडो’मधील त्याच्या भूमिकेची एक झलक दाखविली आहे. यात तो खूपच आक्रमक दिसत आहे. या तो “बिट्‌टू’ची भूमिका साकारतआहे.

फोटो शेअर करत त्याने लिहिले की, बिट्टू, “लुडो’मध्ये मी साकारत असलेले पात्र खूपच क्‍लासिक आहे. हे बाहेरून कणखर आणि आतून कोमल हृदयाचे आहे. ही व्यक्तिरेखा साकारणे खूप आव्हानात्मक होते. त्याच्याशी तुमची ओळख करून देण्यासाठी मी उत्सुकतेने वाट पाहत असून नेटफ्लिक्‍सवर 12 नोव्हेंबरला “लुडो’ प्रदर्शित होणार आहे.

अभिषेकचा हा लुक चाहत्यांना खूपच आवडला आहे. यावर फराह खान, बिपाशा बासूसह अनेकांनी कमेंटस्‌देखील केल्या आहेत. दरम्यान, हा चित्रपट “लाइफ इन ए मेट्रो’ चित्रपटाचा सीक्‍वल असल्याचे सांगितले जात होते.

मात्र, अनुराग बसुने ते नाकारले आहे. अनुराग बसु म्हणाले, हा एक ऍक्‍शन कॉमेडी-ड्रामा चित्रपट असून याची कथा एकदम हटके आहे. या चित्रपटातील कास्टबाबत सांगायचे झाल्यास अभिषेक बच्चन, राजकुमार राव, सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख, आदित्य रॉय कपूर, रोहित सराफ आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.