मुंबई – भाजप आणि काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेनेही विधिमंडळ गटनेत्याची निवड केली आहे. नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला असता त्यांची एकमताने निवड करण्यात आली. शिवसेना भवनात पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दरम्यान, आज दुपारी ३.३० वाजता आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते आणि सुभाष देसाई राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
शिवसेना भवनात आज नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. तर सुनिल प्रभू यांची पक्षप्रतोदपदी निवड करण्यात आली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदावरून भाजपा व शिवसेना या मित्रपक्षात चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे.
Eknath Shinde has been elected Shiv Sena’s legislative party leader https://t.co/CbazTo45aN
— ANI (@ANI) October 31, 2019
Mumbai: Shiv Sena leaders including Aditya Thackeray, Eknath Shinde, Diwakar Raote and Subhash Desai to meet Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari today at 3.30 pm pic.twitter.com/kmtF7nS2iI
— ANI (@ANI) October 31, 2019