कयारनंतर ‘माहा’ चक्रीवादळाचा किनारपट्टीवर धोका; आणखी पाऊस कोसळणार

पुणे : गेल्या काही दिवसात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. त्यामागे कयार हे वादळ कारणीभूत होते. परंतु, आता कयार नंतर हा चक्रीवादळ ‘माहा’चाही कोकण किनारपट्टीवर धोका निर्माण झाला आहे. चक्रीवादळ माहामुळे अलीकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भागात पाऊस होत आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, ही प्रणाली वायव्य दिशेने वाटचाल करत राहील आणि मध्य-पूर्व अरबी समुद्रामध्ये राहील, तीव्रतेत वाढू होवून ते आज तीव्र चक्रीवादळ बनेल. या पार्श्वभूमीवर दक्षिण कोकण आणि गोवा येथे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वेंगुर्ला, आणि हर्णे येथे येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय पुढील दोन ते तीन दिवस समुद्र देखील खवळलेला राहील.

दरम्यान, माहा चक्रीवादळामुळे मुंबईत देखील पावसाचा जोर वाढेल आणि १ नोव्हेंबरच्या सुमारास हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात १ नोव्हेंबरपर्यंत विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील. पुणे शहरात देखील पुढील दोन दिवस गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)