कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा पंतप्रधानांना खोचक सल्ला
नवी दिल्ली : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज दुपारी त्यांचे चेन्नईच्या विमानतळावर आगमन होणार आहे. याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे भव्य स्वागत करणार आहेत . दरम्यान, दोन्ही जागतिक नेत्यांची महाबलीपुरम येथे अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या अनौपचारिक भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधानांना सल्ला दिला आहे. मोदीजींनी त्यांची-56 इंची छाती दाखवावी असे म्हणत मोदींना लक्ष केले आहे.
As Xi Jinping supports Imran Khan on Art.370 Modiji look him in the eye at Mamallapuram and say :
1) Vacate 5000km of land in POK occupied by China trans-Karakoram
2) No Huawei in India for 5GShow your 56” ki chhati !
Or is it :
Haathi ke daant khane ke aur dikhane ke aur
— Kapil Sibal (@KapilSibal) October 11, 2019
कपिल सिब्बल यांनी ट्विटरच्या माध्यमातून चीनच्या अध्यक्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीला लक्ष्य केले. त्यांनी ट्विट करत मोदीजींनी त्यांची-56 इंची छाती दाखवावी आणि जिनपिंग यांच्या डोळ्यात डोळे घालून पाकव्याप्त काश्मीरमधील 5,000 किमी जागा रिकामी करण्यास सांगावे असे म्हटले आहे. तसेच ‘शी जिनपिंग यांनी कलम 370 वर इम्रान खान यांचे समर्थन केले आहे, अशा परिस्थितीत मोदीजींनी मम्मलपुरममधील त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पीओकेच्या ताब्यात असलेली 5000 किमी जागा रिकामी करण्यास सांगावे तसेच भारतात 5G साठी चिनी कंपनी हुआवेईला गरज नसल्याचे सांगावे असेही त्यांनी म्हटले.
पंतप्रधानांना टोला लगावत सिब्बल यांनी पुढे म्हटले, “तुम्ही एक तर त्यांना 56 इंचाची छाती दाखवा किंवा हत्तीचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत असे स्पष्ट करा असेही त्यांनी म्हटले.