रेडा – सध्या सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. अर्ज माघारी घेण्याच्य शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (दि. 7) इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे. यासाठी इंदापूर व दौंड या दोन विधानसभासंघात लक्ष ठेवण्यासाठी देव दत्त शर्मा यांची सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक केली असल्याची माहिती इंदापूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण साळुंके यांनी दिली.
निवडणुकीच्या कालावधीमध्ये निवडणूक निरीक्षक सर्किट हाऊस (हिरवी इमारत) पुणे येथे वास्तव्यास असणार असून, आवश्यकतेनुसार दोन्ही मतदारसंघाच्या ठिकाणी ते भेटी देणार आहेत. नागरिक, मतदार, उमेदवार यांना जर अडचण असेल तर त्यांनाप्रत्यक्ष भेटण्याची वेळ सकाळी 9 ते 10 या एकाच तास असणार आहे. यामध्ये इंदापूर सार्वजनिक बांधकाम उपअभियंता धनंजय वैद्य इंदापूर हे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक यांचे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहे, अशी माहिती सोनाली मेटकरी यांनी सांगितले.