बारामती – बारामती विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि. 13) 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. तर शनिवारी (दि. 13) अर्ज छाननीच्या दिवशी या 13 पैकी एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे.
शिवाजी जयसिंग कोकरे यांनी शपथपत्र संपूर्ण न भरल्याने निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी त्यांचा अर्ज नामंजूर केला. छाननीनंतर 12 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. सोमवारपर्यंत (दि. 7) उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याने सोमवारी बारामती विधानसभा मतदारसंघात नेमके किती उमेदवार रिंगणात असतील हे स्पष्ट होणार आहे.. राष्ट्रवादीचे अजित पवार व भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्यात मुख्य लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.