पुणे: उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या, तसेच शालेय व महाविद्यालयीन क्रीडा क्षेत्रात संघटकांचे कार्य करणाऱ्यांचा अद्वैत क्रीडा केंद्र व महाराष्ट्र राज्य किडस असोसिएशनतर्फे गौरव करण्यात आला.
केंद्राचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध पंच डॉ. मदन कोठुळे, क्रीडा संघटक धनंजय जाधव, नीलेश ठक्कर यांच्या हस्ते भगवान वायाळ, हरिश्चंद्र थोरात, डॉ. आशा बेंगळे, रेखा होशिंग, रेखा आबनावे, मनीषा मदने, संजय शिंदे, भगवान वाघमारे, तुळशीदास कोऱ्हाळे, सचिन शिंदे, गणेश गोंडे यांचा आदर्श क्रीडा पुरस्काराने गौरव करण्यात आला. या वेळी क्रीडा संघटक तन्वीर शेख, क्रीडा प्रशिक्षक संजय कांबळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने व राम जागडे उपस्थित होते