पुणे: जॉय बॅनर्जी, अमित शर्मा, संतोष दळवी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला आणि पुणे महानगर जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) आयोजीत वरिष्ठ टेनिस मालिका स्पर्धेतील 35 वर्षावरील गटात उपांत्य फेरी गाठली.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अव्वल मानांकित जॉय बॅनर्जीने सी. अरुणकुमारचा 7-5 असा पराभव केला. दहाव्या मानांकित संतोष दळवीने पाचव्या मानांकित विवेक खडगेचा 7-4 असा पराभव करीत सनसनाटी निकालाची नोंद केली. अमित शर्माने रवी कोठारीवर 7-0 असा सहज विजय मिळवला. 45 वर्षावरील गटात उपांत्य फेरीत मंदार मेहेंदळेने सुनील लुल्ला याला 8-5 असे हरविले. जयंत येवलेने मनोज देशपांडेला 8-6 असा संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभूत केले.
सविस्तर निकाल- 35 वर्षावरील गट- उपांत्यपूर्व फेरी- जॉय बॅनर्जी वि.वि.सी अरुणकुमार 7-5. अमित शर्मा वि.वि. रवी कोठारी 7-0. संतोष दळवी वि.वि.विवेक खडगे 7-4. आदित्य अभ्यंकर वि.वि.विकास बचलू 7-6(7-2). 45वर्षावरील गट- उपांत्य फेरी-मंदार मेहेंदळे वि.वि.सुनील लुल्ला 8-5. जयंत येवले वि.वि.मनोज देशपांडे 8-6. 50 वर्षावरील गट- अव्वल साखळी फेरी-मनोज हर्डीकर वि.वि.निर्मल वाधवानी 7-4. मनोज हर्डीकर वि.वि.राजेंद्र काटेगावकर 7-1. निर्मल वाधवानी वि.वि.राजेंद्र काटेगावकर 7-1. 55 वर्षावरील गट- अव्वल साखळी – मिलिंद घैसास वि.वि.ऍशले डिसुझा 7-3. चारुदत्त साठे वि.वि. ऍशले डिसुझा 7-5. पवन जैन वि.वि.शरद खानापूरकर 7-3.