श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील बटोटे भागात शनिवारी झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा लष्कराने खात्मा केला. यावेळी दहशतवाद्यांच्या खात्म्या अगोदर त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन कराणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कारण दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास एका महिला पोलिस अधिकाऱ्याने आवाहन केले आहे. या महिला पोलिस अधिकाऱ्याचे सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.
#WATCH Anita Sharma, SSP Ramban, asking terrorists to surrender during the encounter in Batote town of Ramban district of Jammu Zone, earlier today. #JammuAndKashmir pic.twitter.com/jcxGm3CkNy
— ANI (@ANI) September 28, 2019
जम्मू काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील बटोटे भागातील घरांच्या आडोशाने या दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्ती पथकावर हल्ला चढवला. त्यावेळी तेथे चकमक उडाली. दरम्यान, चकमकीच्यावेळी जवानांनी दहशतवाद्यांना पुर्णपणे घेरले होते त्यावेळी महिला पोलिस अधिकारी अनिता शर्मा यांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले होते. त्यांचा हाच व्हिडीओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत लपून बसलेल्या दहशतवाद्याला बाहेर येण्यास सांगत आहेत. एका घराच्या छतावर माईकच्या माध्यमातून अनिता शर्मा या ओसामा…तु बाहेर ये तुला घाबरण्याचे कारण नाही आम्ही असताना तुला काही होणार नाही…अशा प्रकारचे आश्वासन देत शर्मा या दहशतवाद्याला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करत आहेत. तसेच ओसामा नागरिकांना बाहेर पाठवून द्या…त्यांच्यासोबत शस्त्रांस्त्र पाठवून द्या मी तुम्हाला 15 मिनीटांची वेळ देते…बाहेर या…ओसामा मी अगोदरच सांगितले होते तुम्हाला 15 मिनीटे देत आहे त्याची वेळ आता संपत आली आहे असे त्या वारंवार सांगत असताना दिसत आहेत. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवण व्यवसाय करणाऱ्या विजय कुमार आणि त्यांच्या कुटुंबियांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले. मात्र नंतर कुमार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची सुखरूप सुटका करून दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असल्याची माहिती जम्मू पोलिसांनी ट्विटरवरून दिली.