इंदापुरात पावणेदोन लाखांचा गुटखा पकडला

रेडा  – इंदापूर शहरातील राज हॉटेल कासार पटा, सहाबाज जनरल स्टोअर नेताजीनगर, शेख मोहल्ला येथे गुन्हे शाखेकडून एकत्रित छापा टाकण्यात आला. यावेळी 1 लाख 93 हजार 669 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. इंदापूर शहरात राजरोसपणे गुटखा विक्री होत असल्याची माहिती बारामती अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना समजली. त्यांनी याठिकाणी पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी छापा टाकून मुद्देमाल जप्त केला.

आजीज नूरमोहम्मद मोमिन (रा. कासार पट्टा इंदापूर), इम्रान हुसेन शेख, तय्यब मुसा मोमीन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणचे संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक बारामतीचे जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, हवालदार संदीप जाधव, सुरेंद्र वाघ, स्वप्नील अहिवळे, दशरथ कोळेकर, विशाल जावळे, शर्मा पवार, राजेंद्र जाधव, दत्तात्रय मदने, सहायक पोलीस निरीक्षक गणेश लोहकरे, गोकुळ हिप्परकर, जगदीश चौधरी यांनी केली.

गुटखामाफियांचा कारभार चव्हाट्यावर
बारामती गुन्हे शोध पथकाने कारवाई केल्यानंतर गुटखामाफियांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. इंदापूर नगरपरिषदेच्या हद्दीत असणाऱ्या पानटपऱ्या तसेच विविध प्रकारच्या विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये राजरोसपणे गुटखा किरकोळ आणि होलसेल दरात विक्री केला जात आहे. त्यामुळे युवक, विद्यार्थी गुटखा खाण्याच्या आहारी गेले आहेत. दरम्यान, इंदापूर शहर गुटखामुक्‍त कधी होणार, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)