नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने गुजरात राज्यातील विधानसभेच्या आणखी दोन मतदार संघातील पोटनिवडणूका जाहीर केल्या आहेत. राधनपुर आणि बयाद या दोन मतदार संघात या पोटनिवडणूका होत आहेत.
या निवडणूकाहीं 21 ऑक्टोबरलाच होतील. गेल्या शनिवारी या राज्यातील चार मतदार संघातील पोटनिवडणूका जाहीर करण्यात आल्या होत्या. यामुळे आता गुजरात मधील एकूण सहा विधानसभा मतदार संघात या पोटनिवडणूका होत आहेत. काही ठिकाणी विद्यमान आमदार लोकसभेवर निवडून आल्यामुळे तर काही ठिकाणी विद्यमान कॉंग्रेस आमदारांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यामुळे या पोटनिवडणूका घेण्यात येत आहेत.