गडचिरोली – येथील ग्यारापत्ती जंगल परिसरात सी-60 पोलीस जवान आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.
ग्यारापत्ती जंगल परिसरात मोतीराम मडावी यांच्या नेतृत्वाखाली सी-60 चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलीस पथकाच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलीस पथकानेही नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार करत चोख प्रत्युत्तर दिले.
या चकमकीत दोन नक्षली ठार झाले असून काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. आतापर्यंत दोन नक्षल्यांचे मृतदेह पोलीस पथकाच्या हाती लागले आहे.