हिंदी भाषा लादण्यामागे संघाची विचारसरणी

नवी दिल्ली – राष्ट्रभाषा म्हणून हिंदी लादणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे, अशी टीका मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली आहे. “एक देश, एक भाषा आणि एक संस्कृती’ ही संघाची विचारसरणी आहे. ही अजिबात स्वीकारली जाऊ शकणार नाही, असे येचुरी म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकच दिवसांपूर्वी एकसंध देशासाठी हिंदी ही राष्ट्रीय पातळीवरील भाषा योग्यच असल्याचे मत व्यक्त केले होते. त्या पार्श्‍वभुमीवर येचुरी यांनी ही टीका केली आहे.

“राज्यघटनेच्या 8 व्या अनुच्छेदामध्ये उल्लेख असलेल्या सर्वच भाषा आमच्या राष्ट्रीय भाषा आहेत. हिंदी ही संपर्काची भाषा असू शकते. मात्र हिंदी भाषा लादण्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. अशा तऱ्हेचे दुष्परिणाम पूर्वीही झालेले आहेत. सर्वच भाषांना समान वागणूक दिली गेली पाहिजे.’ असे येचुरी म्हणाले.

अमित शहा यांच्या वक्‍तव्यावर बहुतेक विरोधी नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रभाषा म्हणून हिंदीला संबोधण्याचा फेरविचार व्हावा. तसे केल्यास राष्ट्रीय एकतेला धोका निर्माण होऊ शकतो, असे विरोधकांचे म्हणणे आहे.

विविधतेमध्ये एकता ही जरी भारताची संस्कृती असली, तरी सांस्कृतिक एकसंधतेसाठी हिंदी ही राष्ट्रीय पातळीवरील भाषा असायला हवी, असे अमित शहा काल हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना म्हणाले होते. त

सेच हिंदी ही स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख भाषा होती. त्यामुळे हिंदी दिवस राजधानी दिल्लीबाहेर साजरा केला जावा, यासाठी सरकार प्रयत्न करेल आणि देशभर हिंदी सप्ताह साजरा केला जाईल, असेही शहा म्हणाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.