वर्षभरात पाककडून 2050 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन

केंद्राने सुनावले पाकिस्तानला खडेबोल

नवी दिल्ली – पाकिस्तानने गतवर्षी 2050 पेक्षा जास्त वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे जवळपास 21 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्राने दिली आहे. याबाबत पाकिस्तानला तंबी देण्यात आली असून 2003 साली झालेल्या शस्त्रसंधीच्या कराराचे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारच्या प्रवक्‍त्यांनी दिली आहे.

पाकिस्तानने संयुक्तराष्ट्रात काश्‍मीरच्या मुद्यावर मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा आरोप केल्यानंतर भारताने ही माहिती दिली. यावेळी त्यांनी पाकिस्तानला काश्‍मीरच्या मुद्यावर पाकिस्तान खोटी माहिती पसरवत असून गेल्या वर्षभरात त्यांनी भारतात दहशतवादी घुसवण्यासाठी सीमापार भागातून सातत्याने गोळीबार करत आहे. गेल्या वर्षभरात जवळपास 2050 पेक्षा अधिकवेळा त्यांनी युद्धविरामाचे उल्लंघन केले आहे. यात सामान्य नागरिकांचाही बळी गेल्याची माहिती त्यांनी दिली.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतीय सैन्य सीमारेषेवर जास्तीत जास्त संयम ठेवतात आणि सीमेपार दहशतवाद्यांच्या घुसखोरीवर अवास्तव उल्लंघन आणि प्रयत्नांना उत्तर देतात. शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारतीय सैन्य सुद्धा चोख प्रत्त्युत्तर देण्यात आले आहे. ज्यात पाकिस्तानचेच सर्वाधिक नुकसान होत आहे.

यावर्षी पहिल्या आठ महिन्यात भारतीय सैन्याद्वारे 139 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यात नियंत्रण रेषेसोबतच राज्याच्या अंतर्गत भागात सैन्यांसोबत विविध चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या आकडा समाविष्ठ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.