पुणे : पुण्यात मानाचे पाचही मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणूकीस थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. दरम्यान, पुण्यातील मानाचा तिसरा श्री गुरूजी तालिम गणपती विसर्जन मिरवणूकीस सज्ज झाला आहे. श्रींच्या मिरवणूकीस सुभाष आणि सुनील सरपाले यांनी फुलांचा ‘हरे कृष्णा’ रथ साकारला आहे. याच रथात बाप्पा विराजमान झाले आहेत.