अमेरिकेत इंधन वाहून नेणाऱ्या ट्रेनला भीषण अपघात

संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित
डुपो (अमेरिका): अमेरिकेमधील डुपो शहरामध्ये इंधन वाहून नेणाऱ्या ट्रेनला भीषण अपघात झाला. या अपघातानंतर रेल्वेच्या डब्यांमधील इंधनाने पेट घेतल्याने घटनास्थळी आगीचे मोठे लोळ उठले होते. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळापासून अनेक किलोमीटर दूरवरून आगीचे लोळ दिसत होते. यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आणि स्थानिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.

इंधन घेऊन जाणाऱ्या युनियन पॅसिफिक ट्रेनचा स्थानिक वेळेनुसार दुपारी पाऊणच्या सुमारास अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रेनचे 16 डब्बे रुळावरून घसरले. या डब्यांमध्ये मिथाईल आयसोब्यूटिल केटोन हे ज्वलनशील इंधन असल्याने डब्यांनी आग पकडली. या इंधनामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये 12 डब्यांना भीषण आग लागली. एवढ्या मोठ्या दुर्घटनेमधून त्या रेल्वेमधील सर्वजण सुखरूप बचावले आहेत. या अपघातानंतर रेल्वे कर्मचारी तसेच रेल्वे मार्गाजवळील लोकांना वेळीच सुरक्षितस्थळी हलवल्याने कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तापमान आणि घटनेचे ठिकाण बरेच मोठे असल्या कारणाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×