काश्मीरी तरुण म्हणून पॉर्न स्टारचा फोटो केला शेअर
लाहोर : भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने जो तांडव सुरू केला होता. त्या तांडवचा काहीही उपयोग न झाल्याने आता पाक वेगळ्या पद्धतीने भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. असाच एक प्रकार पुन्हा समोर आला आहे. यावेळेस भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीरमधील तरुण म्हणून चक्क एका पॉर्नस्टारचा फोटो रिट्विट केला आहे.
Former Pakistani high commissioner to India Abdul Basit, mistakes Johnny Sins for a Kashmiri man who lost vision from pellet. Unreal times these, really. pic.twitter.com/9h1X8V8TKF
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) September 2, 2019
भारतावर टीका करण्याच्या नादात पाकिस्तानी नेते आणि अधिकारी तोंडघशी पडण्याची ही मागील काही दिवसांमधील दुसरी घटना आहे. जॉनी सीन या पॉर्नस्टार्सचा फोटो असणारी काश्मीरसंदर्भातील एक खोटे ट्विट व्हायरल होत होती. अनंतनागमध्ये दगडफेक झाली असून त्यात पॅलेट गनमुळे युसूफ नावाच्या तरुणाचा डोळा फुटला आहे. सर्वांनी या विरोधात आवाज उठवायला हवा, अशा कॅप्शनसहीत जॉनी सीनच्या या व्यक्तीचा हेच ट्विट बासित यांनी रिट्विट केले आहे. आपली चूक लक्षात आल्यानंतर बासित यांनी हे ट्विट डिलीट केले असले तरी अनेकांनी त्याचे स्क्रीनशॉर्टस आता व्हायरल केले आहे. अनेक भारतीयांनी हे स्क्रीनशॉर्ट शेअर करत बासित यांच्यावर टीका केली आहे.