पौड – शैक्षणिक व सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल टाइम्स ग्रुपच्या ऑप्टिमल मीडिया सोल्यूशन्सच्या वतीने देण्यात येणारा टाइम्स पॉवर मॅन ऍवॉर्ड’ सूर्यदत्ता ग्रुप ऑफ ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया व सुषमा चोरडिया यांना प्रदान करण्यात आला.
मुंबई येथे झालेल्या सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. संजय चोरडिया यांनी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सर्व यंत्रणा उभी केली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यातील व्यावसायिक वाढीसाठी उद्योग संवाद, प्रक्रिया, अध्यापन पद्धती, विद्याशाखा कौशल्ये, शिक्षण संसाधने, प्रेरणादायक सर्जनशीलता यावर संस्थेत भर दिला आहे. त्याचप्रमाणे शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रांत केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान केला आहे.
विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम ते राबवत आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, विविध कौशल्य आधारित प्रशिक्षण, जनजागृती कार्यक्रम व आर्थिकदृष्ट्या वंचित घटक, शेतकरी, सशस्त्र सेना सदस्य, लोकसेवक यांचा समावेश आहे. दिव्यांग मुलांना, सीएसआरच्या पुढाकारातून आणि महिला सशक्तीकरण कार्यक्रम, पर्यावरणीय जागरूकता वाढविणे, कॅम्पसमध्ये आरोग्य तपासणी, राष्ट्र एकत्रीकरण असे विविध उपक्रम डॉ. चोरडिया राबवित आहे. त्यामुळेच या सर्व कार्याची दखल घेत टाइम्स ग्रुपने हा सन्मान केला आहे.