पुणे – राज्यातील सुमारे 3 हजार गावठाणांचा सर्व्हे करण्यात आला आहे. उर्वरित सुमारे 40 हजार गावांचा सर्व्हे ड्रोनच्या सहाय्याने करण्यात येणार असून हे काम वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे.
राज्यात पहिल्यांदाच गावठाणांची मोजणी केली जात आहे. भूमी अभिलेख विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर गावठाणातील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होणार असून त्यातून गावातील अतिक्रमणे, जमिनीचा वादासह अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.गावठाण मोजणीसाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावात हा प्रयोग यशस्वी झाल्याने राज्यभरात ड्रोनचा वापर जमीन मोजणीसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाने 5 ड्रोन उपलब्ध करून दिले आहेत. त्यानंतर 20 ड्रोन उपलब्ध होणार आहेत.