माती, तुरटी, पंचगव्यापासून घडविलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती

पुणे – प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींमुळे जलप्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचे होणारे आवाहन यांची सांगड घालत अपसाऊथ आणि ग्रीन गणेश फाउंडेशन यांनी संयुक्‍तपणे अपसाऊथ वाकड येथे माती, तुरटी, पंचगव्यापासून घडविलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. या मूर्ती माती, तुरटी, गायीचे शेण, पंचगव्य आणि बियांपासून बनविण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर पाण्यात विरघळणाऱ्या या मूर्ती झाडं वाढविण्यासाठी उपयुक्‍त ठरणार आहेत.

अपसाऊथचा नेहमीच पर्यावरणपूरक आणि शाश्‍वत विकासाच्या व्यवसायावर भर राहिला आहे. हरित गणेशोत्सव ही संकल्पना पुढे आणण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा आनंदोत्सव साजरा करतानाही सर्व गणेशभक्‍तांच्या मनात पर्यावरणाविषयीची संवेदनशीलता व आत्मियता जागी राहिली पाहिजे, असे मत बिलियन स्माईल्स हॉस्पिटॅलिटी प्रा.ली.चे उपाध्यक्ष कुमार गौरव यांनी व्यक्‍त केले.

गणेशोत्सव पर्यावरणपूरकपणे साजरा करावा. त्याकरिता सर्व गणेश मंडळांनी त्यात सक्रीय सहभाग नोंदवावा,असे आवाहन ग्रीन गणेश फाउंडेशनचे संस्थापक रश्‍मी औसेकर यांनी केले आहे.

पर्यावरण रक्षणासाठीच…
पर्यावरण रक्षण करण्यासाठी जनजागृती हा या उपक्रमाचा उद्देश आहे. घराजवळच्या जमिनीत किंवा मातीच्या कुंडीमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करून कशाप्रकारे झाडे वाढविता येऊ शकतात, हे उपक्रमामधून सांगितले जाणार आहे. या मूर्तींचे विसर्जन करताना निसर्गाची हानी होऊ नये, याकरिता नैसर्गिक रंगांचा वापर केला आहे. त्यामुळे विसर्जनानंतर पाणी प्रदूषित होण्याचा धोका असणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.