मुंबई : धुळ्यातील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात तिघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावी, अशी शिफारस प्रकरणात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने केली आहे. या प्रकरणात स्थानिक जमिन अधिग्रहण अधिकारी प्रतिभा सपकाळे, तहसिल अधिकारी रोहिदास खैरनार आणि मध्यस्थ दत्तात्रय देसले या तिघांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
कामात अनियमितता आणल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी शिफारस समितीने केली आहे. जानेवारी 2018 मध्ये धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती. त्यानंतर माजी जिल्हा न्यायाधीश श्याम दरणे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापण करण्यात आली होती त्याच समितीने आता आपला अहवाल राज्य मानवी हक्क आयोगाकडे सोपवला आहे.