राजगुरूनगर – राजगुरूनगर शहरात आज स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील शासकीय ध्वजारोहण प्रभारी प्रांत अधिकारी समीक्षा चंद्राकार यांच्या हस्ते तहसीलदार कार्यालयात झाले.
येथील हुतात्मा राजगुरु राष्ट्रीय स्मारकात कीर्तीचक्र पुरस्काराचे मानकरी संतोष राळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी त्यांनी त्यांच्या सेवेतील थरारक आठवणी सांगितल्या. खेड तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात, संस्था संघटनांच्या कार्यालयात त्यांच्या प्रमुखांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.