पुणे – पुण्यातील विप्रो या बी.पी.ओ कंपनीतील महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार करून तिची निघृणपणे हत्या केल्याप्रकरणी कॅब चालक पुरषोत्तम बोराटे आणि त्याचा साथीदार प्रदीप कोकडे या दोघांना झालेली फाशीची शिक्षा सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगित केली आहे व दोन्ही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दोघांची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर राष्ट्रपतींनी दोघांचा दयेचा अर्जही फेटाळला होता. परंतु दयेचा अर्ज फेटाळूनही शिक्षेची अंमलबजावणी न झाल्याने दोघांची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली होती.