ट्रेण्ड इज युअर फ्रेंड (भाग-1)

मागील दोन आठवड्यात बाजारानं चांगलाच रंग दाखवला आहे. परंतु हा रंग ओळखण्यासाठी आपल्यापैकी बहुतेक सर्व अगदी जिवाचं रान करताना आढळतात. परंतु फार कमी लोकांनाच यात यश मिळताना दिसतं आणि बहुधा असं यश हे चुकून लागलेल्या मटक्‍यासारखं असतं. परंतु बाजाराचा अगदी अचूक रंग ओळखण्यात जरी आपण यशस्वी ठरलो नाही तरी कांही अशा गोष्टी आहेत की ज्यामुळं आपल्याला बाजार खूप महाग झालाय किंवा स्वस्त झालाय हे कळू शकतं.

जेंव्हा पानवाल्यापासून लॉंड्रीवाल्यापर्यंत कोणीही तुम्हाला एखाद्या कंपनीच्या शेअरखरेदीबद्दल (फुकटची) टीप देऊ लागतो तेंव्हा ओळखावं की बाजार स्वस्त (सहज) म्हणजेच बाजाराच्या भाषेत महाग म्हणजेच ओव्हर बॉट झालाय. आणि अगदी याउलट म्हणजे जेंव्हा सर्वसामान्य गुंतवणूकदार बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेऊन इतरत्र ठिकाणी गुंतवू पाहतोय असं आढळून आल्यास बाजारानं तळ गाठलाय असं समजावं. नक्कीच हे अनुभव आपण घेतच आलेलो असतो.

आता हे झाले भौतिक व्यवहारिक अनुभव. परंतु बाजाराचा खरा रंग ओळखण्यापेक्षाही महत्वाचा ठरणारा मुद्दा म्हणजे बाजाराचा बदललेला रंग ओळखणं आणि हे काहीशा सोप्या अभ्यासानं साध्य होऊ शकतं. त्यासाठी सर्वसाधारणपणे बाजाराचा कल म्हणजे ट्रेंड विचारात घेता येऊ शकतो. ट्रेंड इज युवर फ्रेंड असं मार्केटमध्ये उगाचच म्हटलं जात नाही. आता कल म्हणजे आला टेक्‍निकल म्हणजेच तांत्रिक भाग. आता अगदी बेसिक प्रश्न स्वतःलाच विचारूयात, की जर फक्त एखाद्या कंपनीचं मूलभूत विश्‍लेषण करून त्या कंपनीचे शेअर्स घ्यायचे ठरवले तर ते कोणत्या भावात घ्यायचे; म्हणजे योग्य भाव कोणता आणि दुसरं म्हणजे रोज जर कंपनीबाबतच्या मूलभूत गोष्टी म्हणजेच फंडामेंटल्स बदलत नसतील तर प्रत्येक सेकंदागणिक त्या कंपन्यांच्या शेअर्सच्या भावांत चढ-उतार का होताना दिसतात ? याचं उत्तर एकच ते म्हणजे कोणत्याही गोष्टीची किंमत ही त्या गोष्टीसाठीचा मागणी व पुरवठा निश्‍चित करत असते आणि म्हणूनच इथं तांत्रिक विश्‍लेषणास महत्त्व प्राप्त होतं. आज आपण केवळ ‘कल’ याच गोष्टीबाबत पाहुयात.

ट्रेण्ड इज युअर फ्रेंड (भाग-2)

आता आधी काही नियम समजून घेऊ, नियम 1) Market discount everything (बाजारास सर्व गोष्टी अवगत असतात); नियम 2) If reflects into the prices (कोणत्याही कंपनीच्या प्रत्येक भावातील हालचाल ही चार्टवर उमटली जातेच आणि त्या भावात त्या वेळची प्रत्येक गोष्ट समाविष्ट झालेली असते); नियम 3 : Price move in trends (तक्त्‌यावर, भाव हे एका दिशेतच मार्गक्रमण करतात). पहिले दोन नियम हे कळावयास सोपे आहेत परंतु, तिसरा नियम समजायला अवघड आहे. आता प्रश्‍न आहे की भाव हे एका विशिष्ट दिशेतच मार्गक्रमण का व कसे करतात ? याचं उत्तर समजावून घेण्याचा प्रयत्न करू.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)