दिल्ली – दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीच्या तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरातील राजकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शीला दीक्षित यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झालं. त्यांचा कार्यकाळ दिल्लीच्या परिवर्तनाचा काळ होता. त्यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला, त्यासाठी नेहमीच त्यांचं स्मरण केलं जाईल, असं राष्ट्रपतींनी शोक संदेशात म्हटलं आहे.
Sad to hear of the passing of Smt Sheila Dikshit, former Chief Minister of Delhi and a senior political figure. Her term in office was a period of momentous transformation for the capital for which she will be remembered. Condolences to her family and associates #PresidentKovind
— President of India (@rashtrapatibhvn) July 20, 2019
दरम्यान, दिल्लीचं दिर्घकाळ मुख्यमंत्रीपद त्यांनी भुषवलं होतं. त्यांनी तब्बल १५ वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा भार सांभाळत एक नवा विक्रम आपल्या नावावर केला होता. साल 1998 पासून सलग तीन वेळा त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर निवडून आल्या होत्या. परंतु 2013 साली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा दिल्ली विधानसभा मतदारसंघात पराभव केला होता.