नवी दिल्ली – दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना सर्वात जास्त काळ दिल्लीच्या मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला होता. दिल्लीच्या तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरातील राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरंविद केजरीवाल आदींनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
“शीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं. दिल्लीच्या विकासासाठी त्यांनी अभूतपूर्व काम केलं”, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे.
Deeply saddened by the demise of Sheila Dikshit Ji. Blessed with a warm and affable personality, she made a noteworthy contribution to Delhi’s development. Condolences to her family and supporters. Om Shanti. pic.twitter.com/jERrvJlQ4X
— Narendra Modi (@narendramodi) July 20, 2019
दरम्यान, दिल्लीचं दिर्घकाळ मुख्यमंत्रीपद त्यांनी भुषवलं होतं. त्यांनी तब्बल १५ वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा भार सांभाळत एक नवा विक्रम आपल्या नावावर केला होता. साल 1998 पासून सलग तीन वेळा त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर निवडून आल्या होत्या. परंतु 2013 साली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा दिल्ली विधानसभा मतदारसंघात पराभव केला होता.