सातारा – सिनेस्टेप संस्थेद्वारे नागपूर येथे ज्यूनिअर मिस ऍण्ड मिसेस सेंट्रल इंडिया 2019 या स्पर्धेद्वारे सेमीफायनल स्पर्धा पार पडली. यामध्ये 17 वर्षाची साताराची कु. तन्वी सोडमिसे हिने ज्युनिअर सातारा विजेता हा किताब पटकवला.
या तिच्या यशामुळे सातारचे नाव जगाच्या पाठीवर पोहोचले आहे. या कार्यक्रमाचे ऑडिशन हैद्राबाद, सातारा, पुणे, नाशिक, भोपाळ, नागपूर, रायपूर या सात शहरांमध्ये झाले. या स्पर्धेसाठी एकूण 575 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यातील 45 स्पर्धकांनी फॅशन शो कॉन्टेस्ट आणि टॅलेंट राऊंडमध्ये आपले स्थान निश्चित केले.
या कार्यक्रमाचे डायरेक्टर अनिल सहाणे हे चित्रपट दिग्दर्शक देखील आहेत. या कार्यक्रमासाठी गोंदियावरून मेकअप आर्टिस्ट तृप्ती मेश्राम, जज अखिलेश माने, मिस ज्यूनिअर मिसेस सेंट्रल इंडिया 2018 ची उपविजेती वंशिता मेश्राम, नम्रता जयानी, अभिनेत्री कविता लांजेवार यांनी परीक्षकाची भूमिका पार पाडली. सतत आठ वर्षे ही स्पर्धा नागपूर येथे पार पडत आहे. या स्पर्धेद्वारे अनेकजण ज्यूनिअर विजेत बनत आहेत. तन्वी सोडमिसे हिने हा किताब पटकावून सातारच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलेला आहे. या तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे. तिने या यशाचे श्रेय आपल्या आईवडिलांना दिलेले आहे.