मुंबई – पावसाळी अधिवेशन येत्या १७ जूनला मुंबईत होणार असून या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी सुरु झाली आहे. या बैठकीबाबत धनंजय मुंडे ट्विटद्वारे माहिती दिली आहे.
सोमवार दिनांक १७ जून पासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेससह सर्व विरोधी पक्षनेत्यांच्या संयुक्त बैठकीस बी-४ या माझ्या शासकीय निवासस्थानी प्रारंभ.@NCPspeaks@INCMaharashtra pic.twitter.com/s41u74Me7n
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 16, 2019
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा गटनेता आमदार विजय वडेट्टीवार, शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख, विधानसभा उपनेता आमदार नसीम खान, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, सपाचे नेते आमदार अबु आझमी, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार कपिल पाटील, आमदार भास्करराव जाधव, आमदार हेमंत टकले, आमदार शशिकांत शिंदे, विधानपरिषदेतील गटनेते शरद रणपिसे, आमदार रामहरी रुपनवार उपस्थित आहेत.
तत्पूर्वी, १७ जूनला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपाध्यक्ष विजय औटी आदींसह विधानसभा सदस्य उपस्थित होते.