धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्ष नेत्यांची बैठक

मुंबई –  पावसाळी अधिवेशन येत्या १७ जूनला मुंबईत होणार असून या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी सुरु झाली आहे. या बैठकीबाबत धनंजय मुंडे ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

 

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा गटनेता आमदार विजय वडेट्टीवार, शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख, विधानसभा उपनेता आमदार नसीम खान, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, सपाचे नेते आमदार अबु आझमी, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार कपिल पाटील, आमदार भास्करराव जाधव, आमदार हेमंत टकले, आमदार शशिकांत शिंदे, विधानपरिषदेतील गटनेते शरद रणपिसे, आमदार रामहरी रुपनवार उपस्थित आहेत.

तत्पूर्वी, १७ जूनला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपाध्यक्ष विजय औटी आदींसह विधानसभा सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)