पाटेखैरे मळा येथील जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलिसांचा छापा : 15 जणांना अटक
नारायणगाव – येथे जुगार अड्ड्यावर खेड उपविभागीय पोलिसांच्या पथकाने छापा टाकून 15 जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रकमेसह 11 लाख 83 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती खेड उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी दिली.
प्रकाश बबन काकडे (वय 38, रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर), विलास हरीभाऊ शिंदे (वय 44, रा. वारुळवाडी, ता. जुन्नर), सचिन पोपट काकडे (वय 40, रा. एचपी पंपासमोर नारायणगाव), गणेश लिंबाजी किचमे (वय 33, रा. पाटेखैरे मळा, नारायणगाव), रंगनाथ विठ्ठल कुरकुटे (वय 60, रा. बस स्टॅण्डजवळ, बोटा, ता. संगमनेर), पांडुरंग विठ्ठल वाजगे (वय 60, रा. पाटेखैरे मळा नारायणगाव), प्रदीप काशिनाथ जोरी (वय 59, रा. खैरेआळी नारायणगाव), गुलाब आदम शेख (वय 53, रा. सावरगाव, ता. जुन्नर), सय्यद नजरअली अजगर अली (वय 45, रा. लोणारगल्ली मंचर, ता. आंबेगाव), भानुदास सिताराम बैरागी (वय 60, रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव), प्रकाश देवराम भोर (वय 50, रा. अवसरी खुर्द), जहीर अब्बास नौशादअली सय्यद (वय 40, रा. लोणार गल्ली, मंचर), मच्छिंद्र लक्ष्मण साळुंके (वय 44, रा. नवलेवाडी, ता. अकोले), हेमराज जयराम भदाणे (वय 50, रा. अभंगवस्ती, वारुळवाडी), धनंजय तान्हाजी भुजबळ (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांच्यावर मुंबई जुगार कायदा कलम 4, 5 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. फिर्याद संजय नारायण नाडेकर पोलीस नाईक खेड पोलीस ठाणे यांनी दिली आहे.
याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांचे आदेशाने त्यांना मिळालेल्या माहितीवरून नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नारायणगाव परिसरातीलपाटेखैरे मळा येथे उत्तम दशरथ फुटाणे यांचे शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये काही लोक गोलाकार बसून तीन पानी पत्याचा जुगार पैसे लावून खेळत आहेत.
त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. गायकवाड, आर. के. नलावडे, एस. बी. गाढवे, अर्जुन गोडसे, ए. टी. शिंदे, एस. बी. जाधव, एस. एस. मातोडे, व्ही. बी. वाघ या पथकाने सोमवारी (दि. 10) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उत्तम दशरथ फुटाणे यांचे शेतातील पत्रा शेडमध्ये छापा टाकला असता त्याठिकाणी प्रकाश काकडे, विलास शिंदे, सचिन काकडे, गणेश किचमे, रंगनाथ कुरकुटे, पांडुरंग वाजगे, प्रदीप काशिनाथ जोरी, गुलाब आदम शेख, सय्यद अली, भानुदास बैरागी, प्रकाश भोर, जहीर सय्यद, मच्छिंद्र साळुंके, हेमराज भदाणे हे ग्रुपने बसून तीन पानी जुगाराचा खेळ पैसे लावून खेळत असताना आढळून आले. या छाप्यात पोलिसांनी 73 हजार 300 रोख रक्कम व सिल्व्हर कलरची पॅशन (एमएच 14 डीक्यू 8894), एक भगवे रंगाची बुलेट (एमएच 01 के 1575), स्कार्पिओ (एमएच 14 ईयू 3894), काळे रंगाची स्प्लेंडर (एमएच 14 एएल 6894), डिस्कव्हर मोटरसायकल (एमएच 14 सीएच 461), स्कुटी गाडी (एमएच 14 जीबी 8747), स्कुटी मोटरसायकल (एमएच 14 एफएफ 8152), निळ्या रंगाची मारुती 800 कार (एमएच 16 आर 320), पॅशन प्रो मोटरसायकल (एमएच 03 एडी 6047), हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल (एमएच 14 डीजी 9742), महींद्रा मोटरसायकल (एमएच 14 ईक्यू 9584), टाटा झेस्ट गाडी (एमएच 14 ईक्यू 7815) ही वाहने जप्त करण्यात आली आहे. यापुढील तपास नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक अनिल मोरे व सहायक फौजदार केडी ढमाले हे करीत आहेत.
स्थानिक पोलिसांवर भरवंसा नाय का?
ही कारवाई थेट कोल्हापूर येथून झाली असल्याची चर्चा असल्याने स्थानिक पोलिसांना या ठिकाणी हा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती नव्हती का, त्यांनी ही कारवाई का केली नाही. या कारवाई मुळे जुन्नर तालुक्यातील पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर वरिष्ठ आधिकारी नाराज असल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात जुन्नर येथे शांतता समितीच्या आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप उत्तर्डे यांनी तालुक्यातील अवैध धंदे व एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या विषयी तक्रार केली होती. त्या बैठकीनंतर तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई होण्यास सुरुवात झाली आहे. नारायणगाव येथे थेट खेड विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याने जुन्नर तालुक्यातील अधिकारी व पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत. जुन्नर येथे रविवारी अवैध गांजा विक्रेत्यांवर जुन्नर पोलिसांनी कारवाई केली. पण त्या विक्रेत्याला मागील आठवड्यात तालुक्यातील एका पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका महामार्गावर पांढऱ्या रंगाच्या चारचाकी मध्ये गांजाच्या पुड्यासह पकडले होते. पण एका व्यक्तीच्या मध्यस्थीने आर्थिक तडजोड झाल्याने त्याला सोडले असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.