सूरत – इंग्लंड व बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट मालिकेसाठी भारताचा 19 वर्षाखालील संघ जाहीर करण्यात आला असून या संघाचे कर्णधारपद उत्तर प्रदेशचा फलंदाज प्रियम गर्ग याच्याकडे देण्यात आले आहे. ही मालिका इंग्लंडमध्ये 21 जुलैपासून सुरू होणार आहे.
भारतीय क्रिकेट मंडळाच्या कनिष्ठ निवड समितीने हा संघ निवडला. या मालिकेसाठी भारतीय संघ 15 जुलै रोजी नवी दिल्ली येथून रवाना होणार आहे.
भारतीय संघ – प्रियम गर्ग (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ठाकूर तिलक वर्मा, दिव्यांश, सक्सेना, श्वाश्वत रावत, ध्रुव चंद जुरेल (यष्टीरक्षक), शुभम हेगडे, रवी बिश्नोइ, विद्याधर पाटील, सुशांत मिश्रा, रसिक सालम, समीर रिझवी, प्रग्नेश कणपिल्लेवार, कामरान इक्बाल, प्रियेश पाटील, करण लाल, पूर्णांक त्यागी, अंशुल खंबोज.