साऊथदॅम्प्टन – हाशिम आमला, क्विंटन डी कॉक, फाफ ड्यु प्लेसिस, डेव्हिड मिलर यासारखे तगडे फलंदाज संघात असुनही केवळ खराब प्रदर्शनामुळे स्पर्धेतील तिन्ही सामने गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेसमोर आज वेस्ट इंडिजचे कडवे आव्हान असणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून विश्वचषक स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखण्यास दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रयत्नशील असून आज विजय मिळवत विजयीमार्गावर पुनरागमन करण्यास विंडिजचा संघही प्रयत्नशील असेल.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा वेस्टइंडिजच्या बाजूने लागला आहे. वेस्टइंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेस फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.
West Indies have won the toss and will bowl first at the Hampshire Bowl! pic.twitter.com/jxETSso448
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 10, 2019