गेल्या काही दिवसांमध्ये प्रियंका चोप्राच्या लग्नविषयक बातम्या रोज भारतीय मीडियामध्ये छापून येत होते. इंटरनॅशनल सिंगर निक जोन्स आणि ग्लोबल आयकन प्रियंका चोप्राच्या लग्नाशी संबंधित घडामोडी वर्तमानपत्राच्या मथळ्यांमध्ये सतत दिसून आल्याने स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर ‘न्यूजप्रींट मीडिया’मध्ये प्रियंका सर्वाधिक चर्चित अभिनेत्री झाली आहे. यातच प्रियंकाने नुकताच सोशल मीडियावर एक वडिलांसोबतचा फोटो शेअर करत इमोशनल पोस्ट लिहिली आहे. प्रियंकाने वडील अशोक चोप्रा यांच्यासोबतचा लहानपणीचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. यामुळे पुन्हा एकदा ‘डॅडीज लिटिल गर्ल’ प्रियांका सोशल माध्यमांमध्ये ट्रेडीं आहे.
View this post on Instagram
6 years. Seems Like just yesterday we lost you.. I miss you Dad. Inexplicably.
प्रियंकाने सोशल मीडियावर झाड्यावर बसलेला वडिलासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत वडिल झाडाला पकडून उभे आहेत. प्रियंका हा फोटो शेअर करताना लिहिते, ”तुम्हाला जाऊन 6 वर्षे झाली पण असं वाटतंय तुम्ही कालच आम्हाला सोडून गेलायेत. तुमची फार आठवण येतेय.’ प्रियंकाचे आपल्या वडिलांशी फार जवळचे नातं होते. 2013 साली अशोक चोप्रा यांचं निधन झाले. ‘डॅडीज लिटिल गर्ल’ असा टॅटू प्रियंकाच्या हातावर आहे.