कोलकाता – २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोलिटिकल कॅम्पेन प्रभावीपणे हाताळलेल्या प्रशांत किशोर यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली असल्याचं वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपने पश्चिम बंगालमध्ये विशेष लक्ष घातल्याने ममता बॅनर्जी यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत असून अशातच आज राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांच्यासमवेत काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
Sources: Political Strategist Prashant Kishor met West Bengal Chief Minister Mamata Banerjee and agreed to work with her pic.twitter.com/ss8qQfskJ0
— ANI (@ANI) June 6, 2019