मदतीची याचना करताच जगमोहन रेड्डीनी पीडिताच्या उपचारासाठी दिले 20 लाख रुपये

नवी दिल्ली: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी एका कॅन्सर पीडिताच्या उपचारासाठी 20 लाख रुपये दिले आहेत. एका विमानतळाबाहेर कॅन्सर पीडिताच्या उपचारासाठी प्लेकार्ड तयार करण्यात आले होते. तिथे मदतीची याचना करणाऱ्या तरुणाला पाहताच रेड्डी यांनी मदतीचा हात पुढे केला.

रेड्डी यांनी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर वृद्धांची प्रतिमहिना पेन्शन हजार रुपयांवरून तीन हजार करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी 15 ऑगस्टपर्यंत प्रस्तावित ग्राम सचिवालयासाठी चाल लाख ग्राम स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचाही निर्णय घेतला आहे. प्रत्येक स्वयंसेवकाला नोकरी मिळत नाही, तोपर्यंत प्रतिमहिना पाच हजार रुपये मानधन देण्यात येणार जाणार आहे. रेड्डी यांनी मुख्यमंत्री पदावर येताच प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.