अमेठी- उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये खासदार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या हत्येप्रकरणी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत पाच आरोपीना अटक करण्यात आले आहे. सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पाच आरोपीना अटक करण्यात आली असून यातील पाचव्या आरोपीचे नाव वसीम अशी माहिती उत्तर प्रदेशचे डीजीपी ओ. पी. सिंग यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री वसीमला अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तुलही जप्त केले आहे.वसीमने पोलिसांना पाहताच गोळीबार सुरू केला पोलिसांनीही त्याला प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस आणि वसीम दोघेही जखमी झाले आहेत. तसेच हल्ल्यामागचा हा मास्टरमाईंड असल्याची माहिती मिळत आहे. सुरेंद्र सिंह यांची हत्या झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी तातडीने अमेठीकडे धाव घेतली होती. लोकसभा निवडणुकांमध्ये अमेठीत स्मृती इराणींसाठी सुरेंद्र सिंग यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. अमेठीतून स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना हरवले होते. सुरेंद्र सिंग हे स्मृती इराणी विश्वासू कार्यकर्ते होते.