पिंपरी – दुचाकीवरुन चाललेल्या एका तरुणाला चार जणांच्या टोळक्यांनी थांबवून मारहाण करत त्याच्याजवळी मोबाईल आणि रोख असा एकूण 22 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. ही घटना रविवारी (दि.12) दुपारी पावणेतीनच्या सुमारास निगडी येथील खंडोबा माळ चौक ते थरमॅक्स चौक या दरम्यान घडली. याप्रकरणी अमोल अश्रुबा नाईक (वय 30, रा मोईगाव, ता. खेड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अज्ञात चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास अमोल त्यांच्या दुचाकीवरुन जात असताना गरवारे कंपनीच्या गेट समोर दुचाकीवरुन आलेल्या चार आरोपींनी अमोल यांना अडवले. आरोपींनी अमोल यांना लाथाबुक्याने मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल फोन आणि रोख रक्कम 15 हजार असा एकूण बावीस हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.