पिंपरी – दुकानाचे शटर उचकटून दुकानातील 65 हजार रुपये किंमतीच्या सिगारेट चोरून नेल्याची घटना शनिवारी रात्री ते रविवारी सकाळी पावणेअकराच्या दरम्यान कासारवाडी येथील शास्त्री चौक परिसरात घडली. याप्रकरणी सुनिल लक्ष्मणदास मगनानी (वय-32) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सुनिल यांचे कासारवाडी येथील शास्त्रीचौक येथे दुकान आहे. शनिवार (दि. 11) मे रोजी रात्री ते दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला व दुकानातील काऊंटरखाली ठेवलेले 65 हजार रुपये किंमतीच्या सिगारेट चोरून नेल्या. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गाढवे करीत आहेत.