चेन्नई – दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेला अभिनेते कमल हसन सध्या राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावून पाहत आहेत. कमल हसन यांनी मक्कल निधी मय्यम या राजकीय पक्षाची स्थापना केली असून ते सध्या तामिळनाडूतील मध्यावधी निवडणुकांसाठी जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. अशातच आज कमल हसन यांनी चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारावेळी “नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता” असं वक्तव्य केल्याने अखिल भारतीय हिंदू महासभेनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
दरम्यान, ‘नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता, या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ माजली आहे तसेच अखिल भारतीय हिंदू महासभेनं या वक्तव्याच्या निषेध करत कमल हसन यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच भाजप-शिवसेनेकडून त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.