भोपाळ – भोपाळमधील निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे येथील राजकीय वातावरण अधिकाधिक तापत चालले आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ कॉम्पुटर बाबा यांनी हजारो साधूंना सोबत घेऊन प्रचार सुरू केला आहे. तसेच भोपाळमध्ये हठयोग आयोजित करण्यात आला आहे. कॉम्पुटर बाबा यांनी ‘भाजपा सरकार गेली पाच वर्ष सत्तेत आहे. मात्र राम मंदिर उभारू शकले नाहीत. आता राम मंदिर नाही तर मोदी पण नाही’ असं म्हटलं आहे. दिग्विजय सिंह यांनी कॉम्प्युटर बाबांसोबत पूजा आणि हवनमध्ये सहभाग घेतला. या पुजेसाठी हजारो साधू भोपाळमध्ये पोहचले आहेत.
MP:Computer Baba who was granted status of minister in BJP govt,camps in Bhopal along with thousands of sadhus to undertake Hat Yoga,also campaigns for Congress leader Digvijaya Singh,says,”BJP sarkaar 5 saal mein Ram Mandir bhi nahi bana paayi. Ab Ram Mandir nahi toh Modi nahi” pic.twitter.com/BvvgBU7HxC
— ANI (@ANI) May 7, 2019