‘आता राम मंदिर नाही तर मोदी पण नाही’ – कॉम्पुटर बाबा

भोपाळ –  भोपाळमधील निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे येथील राजकीय वातावरण अधिकाधिक तापत चालले आहे. अशातच   काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ कॉम्पुटर बाबा यांनी हजारो साधूंना सोबत घेऊन प्रचार सुरू केला आहे. तसेच भोपाळमध्ये हठयोग आयोजित करण्यात आला आहे. कॉम्पुटर बाबा यांनी ‘भाजपा सरकार गेली पाच वर्ष सत्तेत आहे. मात्र राम मंदिर उभारू शकले नाहीत. आता राम मंदिर नाही तर मोदी पण नाही’ असं म्हटलं आहे. दिग्विजय सिंह यांनी कॉम्प्युटर बाबांसोबत पूजा आणि हवनमध्ये सहभाग घेतला. या पुजेसाठी हजारो साधू भोपाळमध्ये पोहचले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×