अमेरिका-चीन व्यापारयुद्ध चिघळणार; आयात शुल्क वाढविण्याची ट्रम्प यांची धमकी

बीजिंग – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक घेतलेल्या एका निर्णयामुळे चीनमध्ये खळबळ उडाली असून दोन्ही देशांमधील व्यापार युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्हे आहेत. ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या 200 अब्ज डॉलरच्या वस्तूंवर आयात शुल्क वाढवण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या धमकीनंतरही चीनचे एक उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ व्यापाराबाबत बोलणी करण्यासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते गेंग शुआंग यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्या निर्णयानंतर काही प्रसारमाध्यमांनी चीनचे एक उच्च स्तरीय प्रतिनिधी मंडळ व्यापाराबाबत बोलणी करण्यासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार नाही अशी माहिती दिली आहे; परंतु असे काहीही झालेले नसून हा दौरा रद्द करण्याचा प्रश्‍नच नसल्याचे त्यांनी सांगितले. नियोजित दौऱ्यानुसार प्रतिनिधी मंडळ वॉशिंग्टन भेट देऊ, असेही ते म्हणाले.

याआधी रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्‌वीट केले होते आणि येत्या शुक्रवारपासून चीनमधून आयात होणाऱ्या 200 अब्ज डॉलरच्या वस्तूंवरील आयात शुल्क 10 टक्‍क्‍यांवरून 25 टक्‍के करण्यात येऊ शकते, असे म्हटले आहे. याबाबत बोलताना शुआंग म्हणाले की, ट्रम्प यांनी अचानक केलेल्या या घोषणेबाबत चीन माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु ट्रम्प यांच्या निर्णयामुळे चीनमध्ये खळबळ उडाल्याचे स्पष्ट आहे, तसेच या निर्णयाचा प्रभाव आशियाई शेअरबाजारातही दिसून आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.