नवी दिल्ली – १७ वी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी आज, गुरूवारी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघात मतदान होत आहे.
महाराष्ट्रातील नागपूर लोकसभा मतदारसंघात ३ वाजेपर्यंत मतदान ३८.३५% मतदानाची नोंद झाली आहे. तर तेलंगणा राज्यात ४८.९५ % मतदान आतापर्यंत झाले आहे.
Maharashtra: Voting turnout in Nagpur parliamentary constituency till 3 pm is 38.35%. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/3X0j3QVt9t
— ANI (@ANI) April 11, 2019
जम्मू-काश्मीर (जम्मू आणि बारामुल्ला लोकसभा मतदार संघ) मध्ये दुपारच्या १ वाजेपर्यंत ३५.५२% मतदानाची नोंद झाली आहे. तर देशाच्या ईशान्य भागातील सिक्किम मध्ये ३९.०८ % मतदान आणि मिझोराम लोकसभा मतदारसंघात ४६.५% झाले आहे. तर मणिपूरमध्ये ३ वाजेपर्यंत ६८.९० % मतदान झाले आहे. नागालँडमध्ये ६८%, आसाममध्ये ५९.५% आणि मेघालयमध्ये ५५% मतदानाची नोंद ३ वाजेपर्यंत झाली आहे.
35.52% voting recorded in J&K (Jammu & Baramulla Lok Sabha seats) till 1 pm. 39.08 % voting recorded in Sikkim Parliamentary constituency, 46.5 % in Mizoram Parliamentary constituency. pic.twitter.com/APLZUJdO7m
— ANI (@ANI) April 11, 2019
बिहार राज्यातील औरंगाबादमध्ये ३४.६०% मतदान झाले असून, गया मध्ये ३३%, नवाडा मधील ३७% आणि जमुईमध्ये २९% मतदान १ वाजेपर्यंत झाले आहे.
Bihar: 34.60% voting recorded in Aurangabad, 33% in Gaya, 37% in Nawada and 29% in Jamui, till 1 pm. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/weQHYz5cji
— ANI (@ANI) April 11, 2019
कोन्द्र शासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये ३ वाजेपर्यंत मतदार ५१.२५% मतदान झाले असून, देवभूमी उत्तराखंडमध्ये ४६.५९% मतदान झाले आहे.
तर सर्वाधिक खासदार असलेल्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये ३ वाजेपर्यंत ५०.८६ मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे.
Voter turnout till 3 pm in Uttar Pradesh is 50.86%. #IndiaElections2019 pic.twitter.com/eGXvs3XMcz
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 11, 2019