नागपूर : सतराव्या लोकसभेसाठीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम अशा सात मतदारसंघात मतदान होत आहे. या 7 मतदारसंघात एकूण 116 उमेदवार निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. आज दुपारपर्यंत या सात मतदारसंघातील सरासरी मतदान ३८.३५% एवढे झाले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये आपल्या पत्नी अमृता फडणवीस आणि आई सरिता फडणवीस यांच्यासमवेत मतदानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सकाळी ७ वाजता मतदानाचा हक्क बजावला होता.
Maharashtra: Chief Minister Devendra Fadnavis and his wife Amruta Fadnavis cast their vote at a polling station in Nagpur earlier today. #IndiaElections2019 pic.twitter.com/7JWLHuPBjv
— ANI (@ANI) April 11, 2019