Loksabha Candidates List| काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. कॉंग्रेसने माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप आणि विरियातो फर्नांडिस यांची अनुक्रमे उत्तर आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. येथे आम आदमी पक्षाने आणि इंडिया आघाडीतील अन्य पक्षांनाही दोन्ही जागांवर कॉंग्रेसला पाठिंबा दिला आहे.
आज जाहीर केलेल्या यादीत उत्तर आणि दक्षिण गोव्यासह मध्य प्रदेशातील मोरेना, ग्वाल्हेर, खंडवा तसेच दादर आणि नगर हवेली येथील जागांचा समावेश आहे. काँग्रेसने दक्षिण गोव्यातून कॅप्टन विरियेतो फर्नांडिस यांना उमेदवारी दिली आहे. तर उत्तर गोव्यातून रमाकांत खलप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यातील काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाले आहेत. तर दक्षिण गोव्याचे खासदार सार्दिन यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
कोण आहेत रमाकांत खलप?
खलप हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (एमजीपी) तिकिटावर उत्तर गोव्यातून १९९६-१९९८ मध्ये खासदार म्हणून निवडून आले होते. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय कायदा राज्यमंत्री होते. नंतर त्यांनी एमजीपी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कायदा मंत्री म्हणून, खलप यांनी भारतीय लवाद कायदा लागू करण्यासाठी काम केले आणि भारताच्या नागरी प्रक्रिया संहिता आणि भारताच्या फौजदारी प्रक्रिया संहितेत सुधारणांचा मसुदा तयार केला. त्यांनी संसदेत महिला आरक्षण विधेयकही मांडले.
Congress releases list of six candidates for parliamentary constituencies of North and South Goa; Morena, Khandwa & Gwalior, Madhya Pradesh and Dadar & Nagar Haveli (ST) pic.twitter.com/vUKPkoXuzd
— ANI (@ANI) April 6, 2024
दक्षिण गोव्यातील काँग्रेसचे उमेदवार फर्नांडिस हे भारतीय नौदलाचे माजी अधिकारी आहेत. एक्स हँडलवरील त्याच्या प्रोफाइलमध्ये ते भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी, कारगिल युद्धातील सैनिक, मेकॅनिकल इंजिनीअर, एरोनॉटिक्स इंजिनीअरिंग स्पेशलायझेशन आणि डबल एमबीए असल्याचे त्यांनी नमूद केले. फर्नांडिस यांनी दाबोलिम मतदारसंघातून 2022 ची गोवा विधानसभेची निवडणूक लढवली होती.
गोव्यात ७ मे रोजी एकाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. सत्ताधारी भाजपने उत्तर गोवा (श्रीपाद नाईक) आणि दक्षिण गोवा (पल्लवी डेम्पो) जागांसाठी आधीच उमेदवार जाहीर केले आहेत. लोकसभेच्या गोव्यामध्ये दोन जागा आहेत. उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातून भाजप आणि रिव्होल्युशनरी गोवन्स अर्थात आरजी या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार यापूर्वी जाहीर केले आहेत.
हेही वाचा:
बाल तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई ; छापा टाकत 8 मुलांची सुटका, अनेक जण ताब्यात